आपण विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे आणि त्याचे दायित्त्व म्हणून हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी वरळीत धनुष्यबाणाला पाठींबा देऊन शिवसेनेला (शिंदे) समर्थन देणार आहे.आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसीत महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या,२० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्यने मतदानाचा हक्का बजावायचा आहे.आपले प्रत्येक मत अनमोल आहे असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.पत्राच्या खाली राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचाही वापर करण्यात आला आहे.

मनसेचे उपविभाग सचिव अक्रुर पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२),३३६(४),३५३(२) व १७१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी राजेश कुसळे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुसळे शिवसेना (शिंदे) माजी शाखा प्रमुख असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वरळी विभागात हे पत्र वायरल झाल्यानंतर वरळीतील शिवसेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्याशी संपर्क साथला त्यानंतर ते पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले.त्या पत्रात राज ठाकरे यांच्या लेटरहेडचाही वापर करण्यात आला आहे.मतदानाच्या दिवशीच बुधवारी पहाटेपासून हे पत्र वरळी विधानसभा मतदारसंघात तसेच आग्रीपाडा परिसरात वायरल झाले होते.याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.