काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे एग्झिट पोलचे अंदाज समोर आले असून त्यात महायुतीला बहुमत मिळेल असे नमूद करण्यात आले असून एकूण १० पैकी सहा एग्झिट पोल्सने महायुतीलाच बहुमत मिळेल असा कौल दिला आहे.यामध्ये पी-मार्क,पीपल्स पल्स,मॅट्रिझ,चाणक्य,लोकशाही मराठी रुद्र अशा काही एग्झिट पोल्सचा समावेश आहे.

आघाडीनिहाय एग्झिट पोलचे अंदाज

पोल महायुती मविआ इतर
P-MARQ १३७ – १५१ १२६ ते १४६ २ ते ८
People’s Pulse १७५ ते १९५ ८५ ते ११२ ७ ते १२
Matrize १५० ते १७० ११० ते १३० ८ ते १०
Lokshahi-Marathi Rudra १२८ ते १४२ १२५ ते १४० १८ ते २३
JVC १०५ ते १२६ ६८ ते ९१ ८ ते १२
Chanakya १५२ ते १६० १३० ते १३८ ६ ते ८
Dainik Bhaskar १२५ ते १४० १३५ ते १५० २० ते २५
Electoral Edge ११८ १५० २०
Poll Diary १२२ ते १८६ ६९ ते १२१ १० ते २७

या एग्झिट पोल्समुळे सत्ताधाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी महाराष्ट्रात एग्झिट पोलचे अंदाज बरोबर उलटे झाल्याचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याने पाहिले आहे त्यामुळे हे एग्झिट पोलदेखील फिरणार की सत्ताधाऱ्यांना कौल मिळणार ? याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसभेवेळी काय होते एग्झिट पोलचे अंदाज ?

पोल महायुती मविआ इतर
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स ३४ १३
न्यूज २४ चाणक्य ३३ १५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ ३० ते ३५ १३ ते १९
रिपब्लिक PMARQ २९ १९
टीव्ही ९ पोलस्ट्राट २२ २६
एबीपी-सी व्होटर २४ २३

लोकसभा निवडणुकीवेळी देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीला मोठे यश मिळेल असाच अंदाज बहुसंख्य एग्झिट पोल्सने दिला होता त्यात इंडिया न्यूज,न्यूज २४ चाणक्य,रिपब्लिकन भारत-मॅट्रिझ,रिपब्लिक पीएमएआरक्यू अशा एग्झिट पोलचा समावेश होता.दरम्यान या एग्झिट पोलच्या बरोबर उलटे निकाल प्रत्यक्षात महाराष्ट्रात लागल्याचे पाहायला मिळाले.महायुतीची थेट १७ जागांवर पीछेहाट झाली तर महाविकास आघाडीने ३१ जागांवर यश मिळवले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीला बहुमताचा अंदाज वर्तवणारे एग्झिट पोल खरे ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.