बागेश्वर धाम-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले असून मंदिर असो की मशिद दोन्ही धर्मस्थळांमध्ये आरती,नमा यानंतर वंदे मातरम गायले गेले पाहिजे यामुळे देशभक्त कोण आहेत आणि राष्ट्र विरोधी कोण ? ते लक्षात येईल असे धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले आहे.मंदिर असो किंवा मशिद असो दोन्ही धर्मस्थळांवर वंदे मातरम म्हटले गेले पाहिजे जर हा नियम लागू केला तर देशभक्त कोण आहे आणि राष्ट्रविरोधी कोण ? ही बाब स्पष्ट होईल असे बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले असून या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत मात्र हे वक्तव्य चर्चेतही आले आहे.
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले,सगळ्या समुदायांना देशात समान स्थान आहे तसेच त्यांचा योग्य सन्मान केला जातो मात्र वंदे मातरम म्हणण्याची प्रथा सुरु करण्यात आली की लोकांमध्ये देशभक्ती आपोआपच रुजली जाईल तसेच कोण देशभक्त आहे आणि कोण राष्ट्रद्रोही आहे ? हे देखील समजेल.अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने उचलण्यात आलेले ते पाऊल असेल.लोकांमधल्या धार्मिक बाधा दूर होतील आणि एकमेकांमध्ये बंधूभाव वाढेल असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.सनातन एकता पदयात्रेबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणाले,या यात्रेचे आयोजन हिंदूंमध्ये एकता आणि एकात्म भाव निर्माण करणे हा आहे.हिंदूंनी जातीभेद विसरुन एक झाले पाहिजे.हिंदूंमध्ये हिंदू असल्याची भावना वाढली आहे आणि ही बाब चांगली आहे.सध्याचे वातावरण हे हिंदू एकतेचे आणि एकात्मतेचे आहे असेही बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.धीरेंद्र शास्त्री म्हणाले आदिवासी हा शब्द मला मान्य नाही.ते अनादिवासी आहेत.या सगळ्यांना अनादिवासी म्हटले गेले पाहिजे असा प्रस्ताव मी ठेवतो कारण हे सगळे जण प्रभू रामचंद्रांसह उभे होते तसेच हे अनादिवासी शबरीचे वंशज आहेत त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे असेही बागेश्वर धाम सरकार यांनी म्हटले आहे.