Just another WordPress site

परतीच्या पावसाने सोयाबीन पीक डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी संतोष दौड यांची आत्महत्या

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राज्यात परतीच्या पावसाने सध्या थैमान घातले आहे.सध्या राज्यात सोयाबीन,कापूस,धान पिकांची काढणी सुरू आहे अशा परिस्थितीत परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला झाला आहे.यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.या परिस्थितीत शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय वापरत आहेत.अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे.यात एका शेतकऱ्याने नुकसान झालेले पिक दाखवत सोयाबीनच्या ढिगाऱ्यासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे.संतोष अशोक दौंड असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.मोठ्या मेहनतीने पिकवलेले सोयाबीन पीक डोळ्यादेखत परतीच्या पावसाने वाहून गेल्याने शेतकरी संतोष दौड हे नैराश्येत होते त्यामुळे सदरील शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला.

राज्यभरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने कहर केला आहे.सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा शेतात सडत आहेत तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातही हीच स्थिती आहे.अशा स्थितीत आता पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.