गटनेते पद म्हणजे काय?

गटनेता हा निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचे नेतृत्व सभागृहात करत असतो.२०१९ मध्ये शिवसेनेच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु शिवसेनेतील बंडानंतर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांना गटनेता करण्यात आले त्यानतंर आता ही जबाबदारी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंवर सोपवण्यात आली आहे.निवडून आलेल्या सदस्यांची भूमिका एकच असावी याकरता सर्वानुमते गटनेत्याची निवड केली जाते.या गटनेत्याकडे सर्वाधिकार दिले जातात.गटनेत्याकडून पक्षहितासाठी काही निर्णय घेतले जातात परंतु या निर्णयाविरोधात जर एखादा सदस्य गेला तर त्याच्या निलंबनाची शिफारस सभागृह अध्यक्षांकडे केली जाते.गटनेत्याला सभागृहात अनन्यसाधारण महत्त्व असते.