आज प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले,“जरी घटनाबाह्य असले तरी ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत.ते आणि त्यांची लोक आता नव्याने निवडून आली आहेत.आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील.पण आज संध्याकाळ पर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच असतील.” यावेळी संजय राऊत यांना महायुतीच्या संभाव्य अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले,२०१९ मध्ये आम्ही त्यांना अडीच वर्षांच्या फॉर्म्युला सांगत होतो तेव्हा त्यांना हे मान्य नव्हते.जर अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला असता तर पुढच्या अनेक घडामोडी टळल्या असत्या.पण फक्त उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनाला त्रास द्यायचा होता तसेच पक्ष फोडायचा होता म्हणून तेव्हा अडीच वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही.पण आता ते सर्वकाही करायला तयार आहे.याच्यातून लक्षात घ्या की त्यांना महाराष्ट्र आणि शिसेनेविषयी किती द्वेष आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.