मतदान झाले ३१२ व मतमोजणीत निघाले ६२४

कन्नड विधानसभा मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात ३१२ जणांनी मतदान केले असतांना शिवसेना (UBT)-१९४,शिवसेना (शिंदे)-३२६,अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४ असे मतदान झाले असून या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते.EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? लवकरच हे उघडकीस आणू !” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांत आलेल्या काही बातम्या शेअर केल्या आहेत.द वायरने दिलेल्या बातमीनुसार,महाराष्ट्रात ५ लाख ४ हजार ३१३ अधिकचे मतदान दाखविण्यात आले आहे.प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यात तफावत असल्याचे या बातमीत म्हटले गेले.आव्हाड यांनी ही बातमी शेअर करत निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले आहे.

दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली असून “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का ?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी ? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरे, काय खोटे हे सांगायला तयार नाही.आयोग नेमके काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे ? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.