मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे व १३२ जागा मिळवून भाजपा वरचढ ठरली असून शिंदेंच्या सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही अनुक्रमे ५६ आणि ४० जागा मिळाल्या आहेत त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय पण एवढ्या फुल स्विंगमध्ये महायुतीला मते मिळाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी आता भाजपावर आगपाखड करायला सुरुवात केली आहे हा ईव्हीएमचाच घोळ असल्याचे सर्व विरोधी पक्षांचे मत आहे. १२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेले काही दिवस शांततेची भूमिका घेतली होती परंतु आता त्यांनीही त्यांची चुप्पी तोडली असून मनसेचे अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवर रोख ठेवला आहे तसेच महायुतीने मनसेची फसवणूक केल्याचेही अविनाश जाधव म्हणाले.“महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आम्हाला मान्यच नाही.कोविड काळात मनसैनिकांनी काम केलंय.जे आमदार कोणाला भेटत नव्हते,कोणाच्या घरी जात नव्हते ते आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात आणि मी खात्रीने सांगतो ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती कारण सरकारकडे पैशांची कमतरता नाहीय” असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
भाजपाचा विजय झाल्याने अनेक पक्षांना उतरती कळा लागली असून हे ईव्हीएममुळे शक्य झाले.एवढे मोठे यश आल्यावर इतर लोकांमध्येही आनंद नाहीय.अनेकांना प्रश्न पडलाय की आमचे मत गेले कुठे ? हे मत ईव्हीएमच्या घशात गेलय.देशातील १४० कोटी जनतेला कळावे की आपल्या देशात काहीतरी चुकीचे चालले आहे” असेही मनसे नेते अविनाश जाधव यांनी नमूद केले आहे.
तर लोकांनी चपलेने मारले असते
“अमेरिकेसारख्या देशात बॅलटवर निवडणुका होत असतील तर इथे काय गरज आहे ? हे आम्ही २०१९ लाही म्हणत होतो.आता खात्रीने सांगतो की आमची फसवणूक झालीय.कोर्ट त्यांचे,निवडणूक आयोग त्यांचे.आम्ही कोणाला विचारायचे ? शिवेसनेनेच्या प्रकरणात निर्णय आलेला नाही.पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाहीत. सगळे सेट होते तर मनसे नावापुरती होती.सगळ्या त्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलेने मारले असते.मनसे एक बहाणा आहे.त्यांना हवाय तो अपेक्षित निर्णय त्यांनी आणलाय अशी टीकाही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.
विजयाचे कारण हवे म्हणून लाडकी बहीण योजना आणली !!
प्रचारादरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते.आमदार कोण हे माहीत नव्हते मग अशा लोकांनी डोळे झाकून मतदान केले असेल का ? भाजपाच्या विरोधात लाट आहे असे वाटत होते पण निर्णयानंतर हे सगळे खोटे होते हे सिद्ध झाले.त्यांनी फक्त एक पिक्चर तयार केला.लाडकी बहीण योजने आणली गेली.त्यांना कारण पाहिजे होते ते कारण आणले गेल असा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे.महायुतीने आमची फसवणूक केली.राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत. जोगेश्वरीची सीट मनसेमुळे आली.जो माणूस मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोडतो त्याच्याच पक्षाला पाण्यात पाहता.अपेक्षित आहे की आमच्याबाबतीत काहीतरी चांगला निर्णय होईल.पूर्वइतिहास पाहता ते काही वेगळा निर्णय़ घेतील असे वाटत नाही असेही मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.