कनाथ शिंदेंनी मोदी-शाह यांना दिले निर्णय घेण्याचे अधिकार

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली व या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.जे नाव जाहीर केले जाईल त्या नावाला शिवसेना म्हणून आमचा पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे तसेच कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख खूप मोठी आहे असेही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.दुसरीकडे भाजपाने आणि संघाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचे कळत आहे मात्र याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

महायुतीचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक होणार आहे.महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत त्यापैकी भाजपाला १३२,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० च्या वर जागा मिळवण्यात यश आले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केले जाईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे मात्र याबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही.महायुतीतले प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांना हे सांगितले की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.या सगळ्या गोष्टी असल्या तरीही नेमके कुणाचे नाव जाहीर केले जाणार हा सस्पेन्स कायम आहे.