Just another WordPress site

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज जाहीर होणार ? !! राजकीय घडामोडींना वेग !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार

महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळाले असून निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान एकनाथ शिंदेही रेसमध्ये आहेत अशा चर्चा होत्या. शिवसैनिकांनीही मुख्यमंत्रिपद पुन्हा शिवसेनेला मिळावे अशी मागणी केल्याच्या चर्चा झाल्या मात्र एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली व नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे नाव जाहीर करतील त्या नावाला आमचा पाठिंबा असेल असे त्यांनी म्हटले आहे.आता दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हे स्पष्ट होण्याची चिन्ह आहे.

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.जे नाव जाहीर केले जाईल त्या नावाला शिवसेना म्हणून आमचा पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे तसेच कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ ही ओळख खूप मोठी आहे असेही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.दुसरीकडे भाजपाने आणि संघाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचे कळत आहे मात्र याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही तर अजित पवार यांनी थेट शपविधीची तारीख सांगितली आहे.एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनीही पत्रकार परिषद घेतली.एकनाथ शिंदे यांनी महायुतीला साजेशी भूमिका घेतली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले तसेच दिल्लीत आज (२८ नोव्हेंबर) महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्यानंतर नाव समोर येण्याची शक्यता असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अजित पवार  यांनी थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी शपथविधी घेणार याची तारीखच सांगितली असून महायुतीतले प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांना हे सांगितले की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे शपथविधी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला शपथविधी होतो का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.