मतदानाची टक्केवारी नोंदवण्याची प्रक्रिया

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत एस.वाय.कुरैशी म्हणाले की,मतदारांच्या मतदानाची आकडेवारी रिअल-टाइममध्ये नोंदवली जाते आणि नंतर यामध्ये होणारी ही प्रचंड तफावत चिंताजनक आहे.मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी कशी नोंदवली जाते हे सांगताना एस.वाय.कुरैशी म्हणाले,“मी जे काही पाहतोय ते नक्कीच चिंताजनक आहे.ही आकडेवारी रिअल टाइममध्ये अपडेट केली जाते.जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराची उपस्थिती नोंदवतात. मतदनाच्या दिवशी शेवटी १७ सी अर्जात दिवसभरातील मतदानाची आकडेवारी नोंदवली जाते तसेच त्यावर निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या एजंटच्या सह्या घेतात.”  “फॉर्म 17सी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले याची नोंद केली जाते.हा रिअल-टाइम डेटा त्याच दिवशी प्रकाशित केला जातो मग दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो ते मला समजत नाही” असे कुरैशी पुढे म्हणाले.

निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरैशी पुढे म्हणाले की,“या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे आणि याबाबत योग्य स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशभरात ज्याप्रकारे शंका पसरत आहेत जर त्या प्रत्येकाच्या डोक्यात गेल्या तर निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नाही.”

राज्यात मतदानाच्या आकडेवारीवरुन गोंधळ

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे त्याबाबतचे काही पुरावेही त्यांना सार्वजनिक केले आहेत.राष्ट्रवादीचे (शरद पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच असल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.