कोणतीही निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देत असते अशा प्रकारची परंपरा आतापर्यंत राहिली आहे मात्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही.महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत फरक जाणवतो आहे. जवळपास ७६ लाख मतदान वाढले आहे मग मतदानाची ही वाढ कशी झाली ? आता आम्हाला जे सांगितले जाते की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाले मग कमीत कमी दोन ते तीन किलोमिटरच्या मतदारांच्या रांगा असतील.मग निवडणुका पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो,व्हिडीओ वैगेरे काढत असते मग निवडणूक आयोगाने आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी ५८.२२ टक्के होत असेल तर मग असे काय झाले की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाले ?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.“मतदानाच प्रमाण कसे वाढले ? मतदान जवळपास ७.५ टक्क्यांनी वाढले मग याचे उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावे.राज्यात मतदानाचा टक्का जो वाढला आहे त्याबाबत गंभीर प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहेत.स्वत: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचे पती त्यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.मी जे प्रश्न उपस्थित केले ते त्यांनी देखील उपस्थित केले त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.निवडणूक आयोगाने याचे उत्तर दिले पाहिजे तसेच सायंकाळी साडेपाच वाजता मतदान झालेले आहे त्याचे फोटो आणि व्हिडीओ आम्हाला निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.हे मतदान कोणत्या केंद्रावर झाले ? साडेसात टक्क्यांनी मतदान कसे वाढले ?” असे प्रश्न नाना पटोले यांनी आयोगाला विचारले आहेत.