उपमुख्यमंत्रीपदावर तडजोड !

शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे होते त्यामुळे फडणवीसांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद सोडण्याची तयार नाही या तिढ्यामुळे शहांच्या बैठकीत मंत्रीमंडळ स्थापनेवर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते मात्र भाजप गृहमंत्रीपद कधीही हातून जाऊ देणार नाही त्यामुळे शिंदे गटाने उपमुख्यमंत्रीपदावर तडजोड करावी असे मत महायुतीतील नेत्याने व्यक्त केले आहे.

प्रफुल पटेल,श्रीकांत शिंदेंना मंत्रीपदे ?

● शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा झाली असून ४३ मंत्रीपदांपैकी भाजपकडे २०-२३,शिंदे गटाकडे ११ व केंद्रात १ मंत्रिपद आणि अजित पवार गटाकडे ९ व केंद्रात १ मंत्रिपद अशी वाटणी होण्याची शक्यता आहे.शिंदे व पवार गटाला प्रत्येकी एक मंत्रिपद केंद्रात दिले जाणार असल्यामुळे श्रीकांत शिंदे व प्रफुल पटेल यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

● राज्यात शिंदे सरकारमध्ये २८ मंत्री होते व शिंदेंकडे सर्वाधिक ११,भाजपकडे ९ तर अजित पवार गटाकडे ८ मंत्रिपदे होती यावेळी भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या वाढेल मात्र शिंदे व पवार गटाकडील मंत्रिपदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.