परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल असतांनाही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर करण्यात उशीर होत असल्यामुळे आता विविध नावे समोर आले आहेत. यातच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनीच स्वतःहून भूमिका व्यक्त केली ते म्हणाले, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.”

“आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा.देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो.महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि संसदीय मंडळात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे” असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.