भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मतदान कसे?

जानकर पुढे म्हणाले,या गावातून मला १४०० तर विरोधी उमेदवारांना ५०२ इतके मतदान झाले आहे.आम्ही सर्व माहिती घेतली आहे तरीही विरोधी उमेदवाराला १००३ मतदान दाखविले गेले आहे.ईव्हीएममध्ये दुप्पट मते जात आहेत त्यामुळे उत्तम जानकरला मिळालेले मतदान मशीनमधून भाजपाच्या उमेदवाराला कसे गेले ? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घेत होतो.

दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते किरण माने यांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.“हुकूमशाही भित्री असते.बुळगी असते.फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे,ताठ कण्याचे,सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात.भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील…पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात” अशी पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.