मोहन भागवत यांच्यावर टीका करतांना काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या,“ज्या तरुणांना नोकरी नाही अशा तरुणांना कुणीही आपल्या मुली देत नाहीत.या मुलांना त्यांचे आई वडील सांभाळतात.ज्यांना मुलांना सांभाळण्यासाठी कामे करावी लागतात तसेच जी लग्न झालेली जोडपी आहेत त्यांना त्यांचे उत्पन्न पुरत नाही अशा परिस्थितीत मोहन भागवत सांगत आहेत की किमान तीन मुलांना जन्म द्या.आपण माणसे आहोत ससे नाही जे मुलांना सारखे सारखे जन्म देत राहतील.” अशी खोचक टीका रेणुका चौधरींनी केली आहे.समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा म्हणाले,“कुणी किती मुले जन्माला घालावी हा त्या कुटुंबाचा निर्णय आहे व तो निर्णय त्या कुटुंबावर सोडला पाहिजे.मूल जन्माला घालणे किंवा न घालणे हा सर्वस्वी लग्न झालेल्या जोडप्याचा निर्णय आहे व त्यांच्या इतक्या खासगी निर्णयात कुणीही लक्ष घालता कामा नये.”तर सीपीआय एम च्या नेत्या ब्रिंदा करात म्हणाल्या “मोहन भागवत  यांना महिला म्हणजे नेमके काय वाटतात ? महिला या काही मुले जन्माला घालण्याचे एखादे मशीन नाहीत.तीन मुले जन्माला घाला असा सल्ला देऊन भागतव यांनी एक प्रकारे महिलांचा अपमानच केला आहे.” एकंदरीत या टीका पाहिल्या तर मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत.