सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आयुष्यात संकटे ही सांगून येत नसतात सर्वकाही ठीक आहे असे वाटत असताना अनाहूतपणे एखादे वादळ आपल्या स्वप्नांचा भंग करतात असेच एक वादळ मेघा भगवान सुतार या तरुणीच्या आयुष्यात आले आहे.शिराळा येथील मेघा भगवान सुतार एका मेडिकल मध्ये काम करून आपल्या वयोवृद्ध आजीचा सांभाळ करतेय.घरात कोणीही कमावते नसल्याने घरची जबाबदारी तिच्यावरच आहे.तिला नुकतेच एका दुर्धर आजाराने गाठले आहे.अप्लास्टिक ऍनिमिया असे त्या आजाराचे नाव असून त्याच्यावर उपचारासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च आहे हे सर्व उपचार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होणार आहेत.यासाठी उपाय म्हणजे बोन मारो स्ट्रान्सप्लान्ट करणे हाच आहे आणि हे करणे खुप खर्चिक आहे.मेघा इतर मुलींप्रमाणे हसरी,निरागस व तितकीच हुशार मुलगी!आई वडिलांचे छत्र डोक्यावर नसल्याने ती आजीसोबत राहते.येथील श्री.मेडिकल चे संचालक सचिन मिरजकर व त्यांच्या पत्नी हे दाम्पत्य मेघाची घरच्या सारखी काळजी घेतात.त्यांच्या पुढेही एवढी मोठी रक्कम गोळा करणे दिव्यच आहे.मेघाची तब्बेत साथ देत नाही प्रचंड अशक्तपणा तिला जाणवत आहे आणि रक्कम पूर्ण झाल्याशिवाय उपचार होऊ शकत नाहीत.
मेघाला जीवदान देण्यासाठी व हे सुंदर आयुष्य पुन्हा जगण्यासाठी आपण तिला नक्कीच उभारी देऊ शकतो!एखाद्याला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे तिला खूप जगायचे आहे इतरांना कायम खुश ठेवणारी मेघा तुमच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे!आपण तिला नक्कीच मदत करू शकतो! चला आपण तिच्या मदतीसाठी पुढे होऊया .
आपण या बँक खात्यावर तिला मदत करू शकता .
मेघा भगवान सुतार
बँक ऑफ इंडिया. शाखा-शिराळा
खाते नंबर १५०११०५१०००७१७३/ 150110510007173
आय.एफ.एस. सी कोड
BKID0001501 हा आहे.