केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत बुधवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची औपचारिक निवड जाहीर करण्यात आली.विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाल्यावर फडणवीस यांनी निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल जनतेचे आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व नेत्यांचे आभार मानले त्याचवेळी ‘सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले असून ‘पुढील काळात चार गोष्टी मनासारख्या होतील तर चार मनाविरुद्ध होतील पण आपण व्यापक जनहिताच्या दृष्टीने काम करून आपली शक्ती दाखवून देऊ व सर्वांशी जुळवून घेऊ असेही ते म्हणाले.पुढील वाट अपेक्षापूर्तीची व संघर्षाची आहे आपण एक उद्दिष्ट ठेवून राजकारणात आलो आहोत.पदासाठी किंवा कोणीतरी मोठे करावे यासाठी आलो नाही.एवढा मोठा कौल मिळाल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण व्यापक जनहिताच्या दृष्टीने काम करून आपली शक्ती दाखवून देऊ असे भाजप विधिमंडळ पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.