मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले असून मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना तब्बल ११ दिवस लागले अखेर आज महायुती राज्यात सत्तास्थापन झाले असून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे समीकरण पाहायला मिळाले आहे. आज देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनीमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली असून सर्व वृत्तवाहिना,वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवर या जाहिराती झळकत आहेत. मात्र काही भाजपा समर्थकांनी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला असून या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,आहिल्याबाई होळकर या महान व्यक्तींचे फोटो आहेत त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत तसेच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे फोटो देखील आहेत मात्र यावर राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नसल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला आहे.तर यावर वीर सावरकरांचा फोटो नसल्यामुळे सावरकरप्रेमी व काही भाजपा कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

संभाजी छत्रपती म्हणाले,भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीत अनेक थोर महापुरुषांचा फोटो आहे मात्र त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.माझ्या कानावरही हे प्रकरण आले आहे व अनेकांनी ती जाहिरात पाहिली आहे ते पाहून वाईट वाटले.महाराष्ट्र घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे मोठे योगदान आहे मात्र त्यापैकी शाहू महाराजांना बाजूला करून भारतीय जनता पार्टीने ही जाहिरात दिली आहे ही न पटणारी गोष्ट आहे.महाराष्ट्रात असले प्रकार चालणार नाहीत”.महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे परंतु शाहू महाराजांना बाजूला ठेवायचे आणि केवळ इतर महापुरुषांचे नाव घ्यायचे हे अत्यंत चुकीच आहे महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाणार नाही आम्ही ते खपवून घेऊ शकत नाही भारतीय जनता पार्टीने त्यांची चूक दुरुस्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो असे त्यांनी म्हटले आहे.