कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष !! विशेष अधिवेशन आजपासून !! नव्या सदस्यांना शपथ !! सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड !!
७८ जणांची पहिल्यांदा शपथ
१५व्या विधानसभेत ७८ सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत व या नवीन चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३,शिवसेना (एकनाथ शिंदे) १४,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८,शिवसेना (उद्धव ठाकरे) १०,काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) चार सदस्यांचा समावेश आहे त्याशिवाय तीन अपक्ष व किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.सदस्यांना सभागृहात बोलणे किंवा भाषण करण्यासाठी ही शपथ घ्यावी लागते.
कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष
विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात शपथ दिली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कालिदास कोळंबकर हे शिवसेना,काँग्रेस व भाजप अशा तीन पक्षांकडून आतापर्यंत नऊ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.