कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ डिसेंबर २४ रविवार
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का बसला व त्यामुळे इंडिया आघाडीतील काही पक्ष काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली तसेच इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांना थेट इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा दावा केला आहे.ममता बॅनर्जी यांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्व करण्याच्या विधानानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत मोठे विधान केले असून ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे शरद पवारांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चे भविष्य काय ? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती !!