यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र .समाजव्दारे संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून नुकतीच साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. ए. पी .पाटील हे होते.प्रसंगी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी व्याख्यान,काव्यवाचन स्पर्धा व ग्रंथ प्रदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ.एस.पी.कापडे यांनी ‘वाचाल तर वाचाल’या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढून माणूस सकारात्मक विचार अंगीकारत असतो असे नमूद केले.यावेळी काव्यवाचन स्पर्धेत ९ विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी नोंदविला.यात अनुक्रमे हिना सोनवणे (एस वाय बी ए) प्रथम,गायत्री ठाकरे( टी वाय बी ए )द्वितीय व प्रतीक महाजन( टी वाय बी ए) तृतीय क्रमांकाने यशाचे मानकरी ठरले.मराठी विभाग प्रमुख डॉ.सुधा खराटे व सुभाष कामडी यांनी देखील कविता वाचन केले.विजेत्यांना मराठी विभागातर्फे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.ए.पी.पाटील यांनी प्रतिपादन केले की यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते व ज्ञान हे ग्रंथ वाचनामुळे प्राप्त होते.
यावेळी ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले सदरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी जीवनाला योग्य दिशा व प्रेरणा देणारी तसेच व्यक्तिमत्व विकसित करणारी पुस्तके वाचण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ पी.व्ही.पावरा व छात्रसिंग वसावे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पारधे तिने केले तर आभार खुशी बारसे हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रमोद भोईटे,प्राची कोलते,संतोष ठाकूर,समाधान कोळी व गिरीश बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.