ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी शरद पवार म्हणाले,“आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही मग भारताच याचा वापर का सुरू आहे.आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला.माझी तुम्हाला विनंती आहे की,तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या.याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग,मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ.हे कशासाठी ? तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोकू नये म्हणून”.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की,“मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला.त्यांनी सांगितले की,पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही.मी काय चुकीची गोष्ट केली ? तुमच्या गावी येणे,तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे ? लोकांच्या मनात काही शंका आहेत त्याबद्दल जाणून घेणे,त्याचे निरसन करणे चुकीच आहे का ?”