Just another WordPress site

“महाराष्ट्रात लोकशाहीचा दिवसढवळ्या खून,आमची ७६ लाख मते…” !! नाना पटोलेंचा महायुतीवर आरोप !!

मुंबई-पोलिसद नायक (वृत्तसेवा) :-

दि.०९ डिसेंबर २४ सोमवार

महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड यश मिळाले आहे तर महाविकास आघाडीच्या ४७ जागा येऊ शकल्या आहेत.दरम्यान विरोधक हे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी महायुतीने ७६ लाख मते मिळवली कशी काय ? असा सवाल उपस्थित केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला आकडे दाखवत आमचे आमदार कमी कसे आणि सत्ताधारी आमदार कमी मते मिळून जास्त कसे काय ? हा प्रश्न विचारला त्यावर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी गणित मांडूनच उत्तर दिले असून आता नाना पटोले  यांनी महायुतीचे सरकार कसे आले हा लोकांनाही पडलेला प्रश्न असल्याचे म्हटले आहे.खरे तर एकट्या मारकडवाडीचाच विषय नाही तर प्रत्येक गावात हा विषय निर्माण आहे.आलेले सरकार हे जनतेच्या मनातले आणि मतातले नाही. हे सरकार कसे आले याचाच लोकांना प्रश्न आहे.अनेक गावांमध्ये ग्रामसभांची प्रक्रिया सुरु झाली असून याची दखल मुख्यमंत्री कशी काय घेणार ? निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे.दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणे आणि अशा पद्धतीने असंतोष समोर येणे याची दखल न्यायालयाने घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हे सरकार जनतेच्या मनातले नाही-पटोले
मॉक पोलिंगचा दृष्टीकोन घेऊन सध्या लोक काम करत आहेत.जनतेच्या भावना अशा आहेत की हे सरकार जनतेच्या मनातले नाही.आमची मते चोरली गेली आहेत. रात्रीतून ७६ लाख मते वाढली आहेत तिथेच हा सगळा खेळ दिसून आला.जनभावना मांडण्यासाठी हे सभागृह आहे.जनभावना मांडण्याचे काम आम्ही शनिवारी केले. आमची लढाई विधानसभेतही लढू आणि रस्त्यावरही लढू.प्रतीकात्मक निषेध नोंदवत आम्ही शनिवारी आमदारकीची शपथ घेतली नव्हती.आज आम्ही सगळ्या आमदारांनी मात्र शपथ घेतली आहे.माझे मत हे माझा अधिकार आहे.मतदान केल्यानंतर आपला काही अधिकार उरतो की नाही ? शेतकरी पुन्हा सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार मान्य करणार की नाही ? सरकार जनभावनेचा आदर करणार की नाही ? देशात बेरोजगारी वाढली आहे.नोकरी नसणाऱ्या तरुणांनीही मोर्चे काढले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.एकदा मतदान केले की तुमचा अधिकार नाही असेच सरकार वागते आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.