मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ डिसेंबर २४ सोमवार
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलतांना राज ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बरोबर घेण्यासंदर्भात सूचक विधान केले होते तसेच जिथे जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना बरोबर घेऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्यास विरोध केला आहे तसेच राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही तसेच मी असतांना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय ? असा सवाल करत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांची चांगलीच फिरकी घेतली ते नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बोलतांना रामदास आठवले यांनी म्हटले की,“माझ्याकडे जवळपास शंभर लोकांची नावे आली होती.आम्ही म्हणत होतो की आम्हाला १० ते १२ जागा द्या पण तेव्हा १० ते १२ जागा मिळणे अशक्य आहे असे मला वाटले तेव्हा मी म्हटले की आम्हाला ४ ते ५ जागा द्या.आम्ही महायुतीला सोडणार नाही.आता लोकसभेच्या निवडणुकीवेळी महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून आले आणि लगेच त्यांना महायुतीत परभणीची जागा सोडली.मग मी शरद पवार यांना भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा महायुतीत मिळाली असती पण मी तसे केले नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. आता पुढच्या काही दिवसांत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे कोणते खाते कोणाला मिळते ? आणि कोणत्या पक्षाला किती खाते मिळतात ? याकडे अनेकाचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर बोलतांना रामदास आठवले म्हणाले,आम्हाला (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला) मंत्रिपद मिळते की नाही हे माहिती नाही त्यामुळे कोणत्याही खात्याचा विषयच नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.महायुतीत राज ठाकरे यांच्या सहभागाबद्दल बोलतांना रामदास आठवले यांनी म्हटले की,“राज ठाकरेंची हवा निवडणुकीत गेली आहे.राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत माझ्याशिवाय सरकार येणार नाही अशा स्वप्नात होते पण त्यांचे स्वप्न भंग झाले.राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक फक्त त्यांच्या सभा ऐकायला येतात आणि निघून जातात,मतदान देत नाहीत.राज ठाकरे महायुतीत येतील असे वाटत नाही.पुढे काय निर्णय होणार ? हे मला माहिती नाही पण महायुतीत त्यांना घेण्यास फायदा नाही.मी महायुतीत असतांना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय ?” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली !! रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली !! महायुतीत घेण्यास कडाडून विरोध !!
रामदास आठवले यांना महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे व त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे.संविधान कुणालाच बदलता येणार नाही असे ते म्हणाले तर याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला हाणला.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असतांना अनेक मुद्यांवर भाष्य केले.महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे.संविधान कुणालाच बदलता येणार नाही असे ते म्हणाले तर याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला हाणला तर महाविकास आघाडीला सुद्धा त्यांनी चिमटा काढला.
दोन मंत्री पदाची मागणी
विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर नाशिक दौऱ्यावर आलो आहे असून लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले असे रामदास आठवले म्हणाले. अरक्षण जाणार असा प्रचार करणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे.लाडकी बहीण,महिलांनी मतदान केले.संविधान हे राजकारण पलीकडे आहे.संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही.मुख्यमंत्री पदाची त्यांच्यात महाविकास आघाडीत रेस होती.आमच्या तिन्ही नेत्यांनी अगोरदच सांगीतले होते की आम्ही रेस मध्ये नाही. नाशिकमध्ये सर्वात मोठी धम्म परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मंत्रिमंडळचा विस्तार लवकर करावा अशी मागणी करत त्यांच्या पक्षाला दोन मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला.लोकसभेला महायुतीला अपयश आले तेव्हा आम्ही ईव्हीएम खराब असे म्हणालो का ? असा प्रश्न त्यांनी केला.महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये असे ते म्हणाले.ईव्हीएम मशीन तर याच लोकांनी आणली.आता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल असे ते म्हणाले.महाविकास आघाडीने आता पराभव मान्य करावा असा चिमटा त्यांनी काढला.
रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली असून राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्या शिवाय सत्ता येणार नाही त्यांचे स्वप्न भंग झाले.राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यात फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज आहे असा खोचक टोला आठवले यांनी लगावला.राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही.राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही.राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले.त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे असा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला आहे.