जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे दि.८ डिसेंबर २४ रविवार रोजी ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तुत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात पाडळसे तालुका यावल येथील पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांनी करोना काळात पोलीस व महसूल विभागाला केलेले सहकार्य तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडल्याची दखल घेऊन त्यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निवेदिता माने,उद्योजक श्री.एन.सी.संघवी,सनदी लेखापाल डॉ.शंकर अदानी,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे,डॉ.डी.वाय. पाटील,शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर,हात कंगणेचे तहसीलदार सुशील बेलकर,काकासाहेब देशमुख,सौ संगीता शिंदे, डॉ.सायली पवार,डॉ.चंद्रकांत बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान स्वागत व प्रस्ताविक ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले.
दरम्यान पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पाडळसे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी,मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.