हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे परिणामी उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,जळगाव,नाशिक या चार जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरून ८ ते ९ अंशांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे नंदुरबार,धुळे जिल्ह्यांच्या काही भागात पहाटेचे तापमान दवांक बिंदूपर्यंत पोहोचले आहे.उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचे किमान व दुपारचे कमाल तापमान सरासरीइतकेच आहे.उत्तरेत थंडीची लाट आल्यामुळे आणि पश्चिमी झंझावात सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे बुधवारपर्यंत (१८ डिसेंबर) थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे अशी माहिती निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
जळगावात पारा आठ अंशांवर
राज्यात मंगळवारी जळगावात ८.० अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे तर नाशिक ९.४,नगर ११.७,पुणे १२.३,छत्रपती संभाजीनगर १२.२,परभणी १२.५,अकोला ११.८ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.