महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला होता.यावरही संजय राऊत यांनी टीका केली.ते म्हणाले,त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे.पोलीस,ईडी,सीबीआय,आयटी अशा यंत्रणा आहेत त्यामुळे ते अशाप्रकारचे दावे करू शकतात.अशाप्रकारच्या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत खाली केला असता.

तर पहिला हुतात्मा संजय राऊत असेल !!

“भाजपाने मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी,निकालाची सुरुवात होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून जातील.माझ्यासारखा माणूस कुणाला घाबरत नाही. आम्ही तुरूंगवास सहन केला आहे.रक्त सांडले,रक्त पाहिले असून आता आम्ही सभ्य झालो आहोत.सभ्य आहोत तोपर्यंत ठीक आहे पण जर कुणी महाराष्ट्राच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहे आणि पहिला हुतात्मा संजय राऊत असेल” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.