मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे.भाजपने आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.राज ठाकरेंमुळेच भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप जर दुसऱ्या पक्षाचे ऐकणार असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करणार नाही असे समर्थकांमध्ये बोलले जात आहे.तर मुरजी पटेल यांनी फॉर्म भरायच्या आधीच भाजपने विचार करायला हवा होता.राज ठाकरेंच्या पत्रानंतर निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे.राज ठाकरेंच्या दबावामुळेच मुरजी पटेल यांचा अर्ज भाजपने मागे घेतला असा थेट आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशी विनंती केली होती.राज यांच्या या पत्रानंतरच राजकीय घडामोडींना वेग आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज ठाकरेंची री ओढत ऋतूजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे म्हटले होते.त्यांनतर आज भाजपची बैठक पार पडली व भाजपने या निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.या निर्णयामुळे मुरजी पटेल समर्थक कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले असून त्यांनी आज राज ठाकरे विरोधात घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त केला.