दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीची खास भेट दिली आहे.पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले.या दरम्यान त्यांनी किसान सन्मान योजनेची रक्कम एका क्लिकवर वितरीत केली.तब्बल १६ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला.पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत दरवर्षी ३ हप्त्याच्या माध्यमातून ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
पैसे जमा न झाल्यास,इथे साधा संपर्क –
दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी 155261, 1800115526 अथवा 011-23381092 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.