‘भारतीय प्राचीन,सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून,सत्यातून झाली आहे.सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आजही दडविला जात आहे.या देशाची परोपकारी वृत्ती असून श्रीलंका,मालदीव,लिबिया यातील उदाहरणांवरून ते दिसून आले आहे.देशाची परंपरा शाश्वत आहे.आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही तसेच आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत मात्र आमच्या देवतांवर आक्रमण करून अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल तर ते चालणार नाही.बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत मात्र स्वतंत्र देशात राहायचे असतांना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी अशी विचारणा भागवत यांनी केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त सामाजिक समरसता, पर्यावरण,कुटुंब प्रबोधन,‘स्व’चा बोध आणि नागरी कर्तव्य या पंच परिवर्तन सूत्रांवर आधारी कार्यक्रम संघ राबविणार असल्याचे डॉ.भागवत यांनी या वेळी जाहीर केले

‘राज्यघटनेनुसार आचरण महत्त्वाचे’ !!

देशाने निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार आचरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.राज्यघटनेला धरून प्रामाणिकपणे वाटचाल करावी लागेल.राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचारण केले पाहिजे.या कर्तव्यांची समाजात आणि कुटुंबातही चर्चा व्हावी अशी अपेक्षाही डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.