पाच लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त
महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाची संयुक्त कारवाई
चोपडा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले आहे.यात दोन लाकूड कटाई मशिन,फर्निचर व कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.ही गुप्त माहिती यावल वन विभागाकडून मध्य प्रदेश विभागाला देण्यात आली आणि संयुक्तपणे मोठी कारवाई करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे.यात चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत मध्य प्रदेशातील धामण्या येथील विनोद डोंगरसिंग,राजू दरबार,टोनीराम सुमला,सायसिंग पठाण यांना घरात असलेल्या लाखोंच्या अवैध सागवान लाकडाचा मुद्देमालासह पकडण्यात आले आहे.
घरात आढळून आलेला मुद्देमाल सेंधवा फॉरेस्ट डेपोत हलविण्यात आला आहे.हे सागवानी लाकूड हे महाराष्ट्रातून कापून ते चोरट्या मार्गाने मध्य प्रदेशात नेऊन त्या लाकडाचे फर्निचर करून सर्रासपणे विक्री केले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वैजापूर येथील आरएफओ एस. एम. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी सहायक वनरक्षक प्रथमेश हडपे,आरएफओ एस.एम.सोनवणे,बी.के.थोरात,वैजापूरचे आय.एस. तडवी,वनपाल चुनिलाल कोळी,बाजीराव बारेला,संदीप भोई,गस्तिपथक वनरक्षक योगेश सोनवणे वनरक्षक,सचिन तडवी,आनंद तेली व निखिल पाटील,धवली रेंजर हेमंत प्रजापती,रजनेश त्रिपाठी,अर्जुनसिंग सेंधवा यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.