ईव्हीएम घोटाळा लपवण्याचा प्रयत्न !!

ईव्हीएम घोटाळा लपवण्याचा प्रयत्न मोदी आणि शाह यांनी केला आहे याचाच अर्थ महाराष्ट्र विधानसभा निकालात आणि हरियाणा,ओडिशा आणि बिहारच्या लोकसभा निकालांमध्ये घोटाळा करुन हे लोक सत्तेत आले आहेत.पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म १७ सी पार्ट १ आणि २ ही हरियाणा विधानसभेशी संबंधित कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र ही कागदपत्रे सादर करण्याऐवजी मोदी सरकारने नियमच बदलला.

हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी विजय होत असत !!

मोदी आणि शाह यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाच शिवाय लोकशाही मूल्यांची माहिती देणाऱ्या नियमांवर घाला घालून डॉ.आंबेडकरांच्या संविधानावरही हल्ला केला व एवढे सगळे होत असतांनाही आमची न्यायालये संविधानाची गळचेपी थंडपणे पाहात आहेत.हिटलर,मुसोलिनी हे निवडणुकांमध्ये भरघोस मतांनी विजयी होत असत पण त्यांचा विजय खरा नव्हता.भारतातही हेच घडले आहे.सुप्रीम कोर्ट हतबल आहे किंवा सरकारचे गुलाम आहे असे म्हणत सामनातून ताशेरे झाडण्यात आले आहेत.