सदर मुलगा एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती.दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता.या वाढदिवसाला त्यांने आईकडे मोबाईलची मागणी केली होती मात्र आई औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाऊन संसाराचा गाडा हाकत असताना आर्थिक चणचणीमुळे एकुलत्या एका मुलाचा हट्ट ती पुरवू शकली नाही यामुळे तो दोन दिवस उदास भासत होता.आज ना उद्या तो सुधारेल असे म्हणून आई व बहिण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.अखेर आई व बहिण झोपल्यानंतर गच्चीवर असलेल्या सौर उर्जेच्या अँगलला गळफास लावून त्यांने आत्महत्या केली.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.