छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्यात ही घटना काल रविवारी घडली आहे.सामाजिक कार्यकर्ते हे मॉब लिंचिंग असल्याचे म्हणत आहेत.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे तसेच भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील दुमारपल्ली गावात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या एका व्यक्तीला तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली.सारथी अलियास बुटू असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.त्याला अजय प्रधान आणि अशोक प्रधान या दोघांसह एकाने तांदूळ गोणी चोरल्याच्या संशयावरुन झाडाला बांधले आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेत त्याचा मृत्यू झाला.ही घटना घडल्यानंतर गावातल्या सरपंचांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी पाहिले की सारथी झाडाला बांधलेल्या अवस्थेत तसेच आहेत आणि बेशुद्ध झाले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारथी यांना बांबूने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.ज्यानंतर पोलिसांनी कलम १०३ (१) अंतर्गत तिघांना अटक केली आहे.या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.