“सख्खा भाऊ पक्का वैरी” !! लहान भावाकडून मोठ्या दिव्यांग भावास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी !! पोलिसांचे गुंडाराजला सहकार्य !!
तेल्हारा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रारदार गोपाल शर्मा यांची मागणी
अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
तेल्हारा शहरातील रहिवाशी हे दिव्यांग असून ते त्यांच्या वयोवृद्ध वडिलांसोबत सराफ लाईन परिसरात वास्तव्याला आहेत.सदरहू त्यांच्या दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन त्यांचे लहान भाऊ कपिल शर्मा हे गोपाल शर्मा यांना दिव्यांगात्वावर उद्देशून लंगड्या व अपमानजनक टिंगल उडवतो,हिनवतो तसेच टोमणे मारतो त्याचबरोबर अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे तक्रारदार गोपाल शर्मा यांनी नमूद केले आहे.जेणेकरून “सख्खा भाऊ पक्का वैरी” बनला असल्याचे सदरील घटनेवरून पहायला मिळत आहे.याबाबत तक्रारदार गोपाल शर्मा यांनी सदरील वैरी भावाबद्दलच्या तक्रारीच्या प्रतिलिपी तेल्हारा पोलीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट,जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला,आय.जी.अमरावती यांना पाठविल्या आहेत.दरम्यान अजून पावेतो याबाबत मला न्याय मिळाला नसून तेल्हारा पोलिसांकडून पदाचा दूरुपयोग करून गुंडगिरी करणाऱ्या कपिल शर्मा याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.सदरहू न्याय न मिळाल्यास लवकरच याच्या प्रतिलिपी प्रधानमंत्री,गृहमंत्री,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात येतील असे तक्रारदार गोपाल शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार गोपाल शर्मा यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने तेल्हारा शहरात “गुंडाराज” सुरू असून प्रधानमंत्री,गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून तेल्हारा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे गोपाल शर्मा यांनी म्हटले आहे.दरम्यान रक्षक बनले भक्षक असून तेल्हारा पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने तेल्हारा पोलिसांकडून केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग हक्क अधिकार सुरक्षा कायदा २०१६ कायद्याला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे.त्याचबरोबर तेल्हारा पोलिसांकडून मारहाण,गुंडगिरी,तोडफोड,चोरी करणाऱ्या कपिल शर्मा याला अभय देऊन तेल्हारा पोलिसांकडून पदाचा दूरुपयोग करून गुंडगिरी करणाऱ्या कपिल शर्मा याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.परिणामी तेल्हारा पोलीस स्टेशन बनला पांढरा हत्ती बनला असून तेल्हारा शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे व यात तेल्हारा पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून तेल्हारा पोलीस स्टेशनचा वाली कोणी नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तेल्हारा शहरातील परिस्थिती चिंताजनक होत चालली असून तेल्हारा पोलिसांकडून गुंडगिरी करणाऱ्या कपिल शर्मा याला अभय देण्यात येत आहे.
केंद्र व महाराष्ट्र सरकार यांनी दिव्यांग व्यक्तीच्या हक्क अधिकार सुरक्षेसाठी बनवलेला कायदा ” दिव्यांग हक्क अधिकार सुरक्षा कायदा २०१६” या कायद्याला तेल्हारा पोलिसांकडून हरताळ फासण्यात येत आहे.केंद्र व महाराष्ट्र सरकारने बनवलेले नियम कायदे व सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेले दिशा निर्देश यांचे सक्तीने काटेकोरपणे पालन करणे पोलिसांचे कर्तव्य आहे तरीही पोलिसांकडून केंद्र व महाराष्ट्र सरकारने बनवलेले नियम कायदे धाब्यावर बसून तेल्हारा पोलीस स्टेशनचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे असेही गोपाल शर्मा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
तसेच गोपाल शर्मा यांनी आपल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे,मी दिव्यांग असल्यामुळे किरकोळ अगरबत्ती विक्रीकरून आपला उदरनिर्वाह करीत असतो.दरम्यान दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मी घरात एकटा पलंगावर निजलेल्या अवस्थेत असतांना गुंडगिरी करणारा माझा लहान भाऊ कपिल शर्मा वय ३६ हा नेहमी प्रमाणे माझ्याजवळ येऊन अश्लील शिवीगाळ केली आणि लंगड्या तू लय माजला आज तुझा मुडदाच पाडतो असे कपिल शर्मा यांनी म्हटले.त्यानंतर गोपाल शर्मा यांनी विचारले की,शिवीगाळ का करीत आहे तेव्हा कपिल शर्मा यांनी जोरात छातीत लाथ मारली त्यावेळी गोपाल शर्मा तडफडून पलंगावरून खाली पडले नंतर कपिल शर्मा हा आतील खोलीत शिरला व त्याने खोलीत ठेवलेल्या पिशव्या हूसकायला सुरुवात केली त्यावेळी पिशवीत ठेवलेले ३५००/-रुपये कपिल शर्मा याने चोरले तसेच सोबत ठेवलेल्या कागदपत्रांची फेकफाक केली.गोपाल शर्मा यांनी कपिल शर्मा यांना थांबवायला गेले असता त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरात असलेल्या फ्रिजची तोडफोड केली तसेच कपिल शर्मा याने गोपाल शर्मा याला जर तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुझे हातपाय तोडून टाकील व तुला जीवाने खतम करून टाकील अशी धमकीही दिली.दरम्यान गुंडगिरी करणाऱ्या कपिल शर्माकडून गोपाल शर्मा यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे व तो कधी जीवाने खतम करेल याचा नेम नाही त्यामुळे कपिल शर्मा यास कठोर शासन होऊन न्याय मिळावा अशी कैफियत गोपाल शर्मा यांनी ४ डिसेंबर २४ रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनला दिली आहे.त्याचबरोबर तक्रारीच्या प्रतिलिपी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट,जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला तसेच आय.जी.अमरावती यांना पाठविल्या आहेत.दरम्यान ९ डिसेंबर रोजी गोपाल शर्मा हे तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी तक्रारीवर काय कारवाई केली असे विचारण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित पोलिसांनी उडवाउडीची उत्तरे दिली तसेच तक्रार देऊन २० दिवस उलटूनही कपिल शर्मा यावर कुठलीही कारवाई तेल्हारा पोलिसांनी केली नाही व कपिल शर्मा अद्यापही मोकाटच फिरत असून तेल्हारा पोलिसांकडून गुंडगिरी करणाऱ्या कपिल शर्मा याला अभय दिले जात आहे हे विशेष !.तरी मला तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी गोपाल शर्मा यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.