Just another WordPress site

“लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे २१०० रुपये नेमके कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार

लाडकी बहीण योजनेच्या  लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना १५०० रुपये मिळतील.दरम्यान निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींना नेमका किती निधी मिळणार असे विचारले जात होते याबाबतच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती सांगितली आहे.

लाडक्या बहि‍णींना डिसेंबर महिन्यात नेमके किती रुपये मिळणार ?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे व अर्थसंकल्पीय बजेट जेव्हा पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्या वेळेला २१०० रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे.आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे व त्याची सुरुवात केलेली आहे.नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे.डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आता केलेली आहे.डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहचलेला असेल असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

नव्या रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी होणार ?

नवीन लाभार्थींच्या नोंदणीच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचे दिसत असून यावरही आदिती तटकरे यांनी यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. रजिस्ट्रेशनची शेवटची मुदत १५ ऑक्टोबर होती.१५ ऑक्टोबरपर्यंत अडीच कोटी महिलांनी नोंद केलेली आहे तसेच अद्यापपर्यंत पुन्हा रजिस्ट्रेशनला सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.सध्यातरी नोंदणी केलेल्या महिला,पात्र महिलांपर्यंत सन्माननिधी पोहोचवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे.ज्या महिलांचे अर्ज मान्य झालेले आहेत पण आधार सिंडिंगमुळे ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्या महिलांना कसा लाभ मिळेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे.आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरु करण्याचा निर्णय सध्यातरी झालेला नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

सरसकट अर्जांची पडताळणी होणार का ?

लाभार्थी महिलांचा अंदाजित आकडा आणि रजिस्ट्रेशनची संख्या लक्षात घेऊन रजिस्ट्रेशन चालू करायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल.तसेच ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या की आम्ही अर्जांची पडताळणी करू पण सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.