जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते.या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे.यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या पत्नी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी या घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अफरा तफरीची तक्रार पोलिसात दिली होती.एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती.या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.या घोटाळयात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळ अन्य याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्ष एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत.आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.या घटनेत पोलीस काय तपास करतात?जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमके कोण दोषी म्हणून समोर येणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.