संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की,ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारी आहे.अजित पवारांसारखा नेता महसूल वाढवण्यासाठी याबाबत विचार करत असेल तर ते राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.जर ते (अजित पवार) खरोखर असा विचार करत असतील तर त्यांनी यशवंतराव चव्हाण… हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात …आणि त्यांच्या होर्डिंग्जवर शाहू-फुले-आंबेडकरांचे फोटो लावतात ते बंद केले पाहिजे” असेही संजय राऊत म्हणाले. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.ते म्हणाले की,“भविष्यात ते ही (लाडकी बहीण) योजना बंदही करू शकतात.लाखो हजारो कोटींचे ओझे घेऊन राज्य चालवणे सोपे नाही.निवडणुकींच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यानंतर तुम्ही निकष लावताय.लाडक्या बहीणींना पंधराशे रुपये देण्यासाठी दारू दुकानाचे परवाने वाढवणे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे.बहि‍णींनी आपल्या घरात १५०० रुपयात आपण कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे.सरकार चांगल्या मनाने पैसे देत नाहीये” असेही संजय राऊत म्हणाले.