भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशावर शोककळा !! देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा !! आजचे शासकीय कार्यक्रम रद्द !! मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ डिसेंबर २४ शुक्रवार
भारताचे माजी पंतप्रधान,अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या,राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती.त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो.मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत.काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होती
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते.विद्वान,मृदू,मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे.जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले.२००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती तसेच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते.मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला.त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले,“देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे.सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ.मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले.त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली.संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत.पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मनमोहन सिंग यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते.विद्वान,मृदू,मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे.जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते,जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले.२००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.
नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
“भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांना गमावले आहे.नम्रपणा जोपसाणारे मनमोहन सिंग सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते.त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला.संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले”,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
प्रियांका गांधी यांनीही व्यक्त केल्या भावना
राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो.त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम उभे राहतील.विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले.ते खऱ्या अर्थाने समतावादी,हुशार,प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते.राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस असे मनमोहन सिंग होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली श्रद्धांजली
“देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे.आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील.अत्यंत साध्या,सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते.त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ,राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ.मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे.शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू.यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची.या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय,मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…”