Just another WordPress site

“डिगंबर तायडे तुस्सी ग्रेट हो सर” !! तायडे सर रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जानेवारी २५ शनिवार

महाराष्ट्राच्या दैदिप्यमान अशा इतिहासात आपल्या गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच तर देशभरात नावलौकिक मिळविलेली जोडगोडी डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांनी पुन्हा आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्राच्या शरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.सदरील जोडगोडी यांना रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अँड ज्ञान फाउंडेशन नागपूर यांच्या वतीने डिगंबर तायडे यांना रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जीवनगौरव पुरस्काराने तर त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला तायडे यांना रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नरी शक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कार त्यांना नागपूर येथे पार पडलेल्या १९ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलनात डॉ.गुरतेजसिंग ब्रार नॅशनल ज्युरी सदस्य आणि शहीद भगतसिंग यांचे पुतणे सरदार किरणजीत सिंग यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

दरम्यान गायन क्षेत्रातील आन-बाण-शान व आपल्या गायनाच्या माध्यमातून दिवसेंदिवस एकामागून एक किताब आपल्या शिरपेचात रोवून महाराष्ट्राचे नाव देशात नव्हे तर परदेशातही गाजविणारे आणि जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील मुळ रहिवाशी तसेच सध्या डोंबिवली येथे वास्त्यव्यास असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाचे सीव्हील इंजिनिअर डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांना “जीवनगौरव” पुरस्काराने तर त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला तायडे यांना “नारी शक्ती” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कारामुळे डोंगर कठोरा वाशियांशिवाय महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.सदरील तायडे जोडगोडीच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल डॉ.डिगंबर सीताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांचे देशभरातून व विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

सदरील पुरस्कार हा विश्वशन्ति,विश्वबंधुत्व,राष्ट्रीय सुरक्षा,राष्ट्रीयकर्तव्य,राष्ट्रीयएकता,राष्ट्रीयसेवा,जलसंस्कृती,संवर्धन,सहिष्णुता,आंतरराष्ट्रीय सौंदर्य,मैत्रीभावना, आरोग्यसेवा,नशामुक्ती,सामाजिक न्याय,विधी,योग,प्राकृतिक चिकित्सा,महिला सक्षमीकरण,साहित्य कला व क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या तसेच विकसित भारताच्या विकासात राष्ट्रधर्म सिद्धांताचे अनुपालन करणाऱ्या प्रतिभासंपन्न व्यक्तींना हा गौरव प्रदान करण्यात येतो.सदरहू राष्ट्रीय विकासात तायडे दाम्पत्याने दिलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अँड ज्ञान फाउंडेशन नागपूर यांच्या वतीने डिगंबर तायडे यांना रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जीवनगौरव पुरस्काराने तर त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला तायडे यांना रेडिएंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नरी शक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.दिवसेंदिवस त्यांच्या कार्याला झळाळी पोहचत असल्याने “डिगंबर तायडे तुस्सी ग्रेट हो सर” अशीच भावना अखिल महाराष्ट्रातील नव्हे तर भारतीयांच्या मनात निर्माण होण्यास क्रमप्राप्त ठरते. 

Leave A Reply

Your email address will not be published.