Just another WordPress site

राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही घेतला.यांनतर अनेकांनी भाजपच्या भूमिकेचे स्वागत केले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे  फडणवीसांना पत्र हा एक स्क्रिप्टचा भाग आहे असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे.पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती.त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर भाष्य करताना हा एक स्क्रिप्टचा भाग होता.खरे तर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने सर्वे केला होता.त्यावेळी ही निवडणूक ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला समजले होते.त्यामुळे भाजपने आपला अर्ज मागे घेतला असे राऊत म्हणाले.

दरम्यान अंधेरी पोटनिवडणुक भाजपने लढवू नये असे पत्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते  त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावे अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती अखेर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला.जेव्हा कधी एखाद्या आमदाराचे निधन होते आणि त्याजागी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहतो तेव्हा उमेदवार द्यायचा नाही ही आपली संस्कृती आहे असे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.