Just another WordPress site

फैजपूर पोलीस पाटील संघाची कार्यकारणी जाहीर !! अध्यक्षपदी विशाल जवरे तर उपाध्यक्षपदी दिनेश बाविस्कर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जानेवारी २५ शनिवार

तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस पाटलांची वार्षिक सभा जिल्हा संघटक सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली फैजपूर येथे नुकतीच घेण्यात आली.यावेळी संघाची नवीन कार्यकारिणी बिनविरोध घोषित करण्यात आली.यात अध्यक्ष-विशाल विलास जवरे (पिळोदा),उपाध्यक्ष-दिनेश बाविस्कर( हिंगोणा),सचिव- हरीश ज्ञानदेव चौधरी (पिंपरूड),सहसचिव-लक्ष्मण टीपा लोखंडे (भालोद),कार्याध्यक्ष-नरेंद्र बाबुराव मासोळे (मारुळ),संघटक-प्रसन्न कुमार चंद्रकांत पाटील (हंबर्डी),
सदस्य-मीना अनिल चव्हाण (कोसगाव),धनराज गोंडु कोळी (भोरटेक),संगीता विशाल दांडगे (दुसखेडा),भरत रघुनाथ पाटील (वनोली),उत्तरा नारायण कोळी (कठोरा प्र-सावदा),संतोष गंभीर कोळी (करंजी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी अरफान रशीद तडवी बोरखेडा बुद्रुक,पुरुषोत्तम हिरामण पाटील विरोदा,तुषार दत्तात्रय चौधरी आमोदा,कैलास रामचंद्र बादशहा कासवा,फारुख मुस्तफा तडवी मोह मांडली,सद्दाम नसीर तडवी बोरखेडा खुर्द आदींसह सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांचा सामूहिक विमा,कार्यशाळेचे आयोजन तसेच प्रवास भत्ता मिळणे कामी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तर यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.