नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते असून दिल्लीत देशाचे चित्र एकवटलेले पाहण्यास मिळते.प्रत्येक संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होते.दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागा आहेत.१.५ कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत.२.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे.५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली जाईल.७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे.२०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती.आता आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
दिल्ली विधानसभेची तारीख जाहीर | कुठल्या तारखेला काय ? |
१) उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख | १७ जानेवारी २०२५ |
२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख | २० जानेवारी |
३) अर्जाची छाननी | २८ जानेवारी |
४) दिल्ली विधानसभा मतदानाची तारीख | ५ फेब्रुवारी २०२५ |
५) दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाची तारीख | ८ फेब्रुवारी |
अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून लढवणार निवडणूक
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत व त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे.केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले.नवी दिल्ली ही VIP सीट आहे.भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवले आहे.इथे सामना रंगतदार असणार आहे.मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे व त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.
आप,काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना
खरेतर आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाल्याचे दिसून येत आहे.अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता व त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचे राजकारण तापलेले पाहण्यास मिळाले.दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावरुन मोदी आणि अमित शाह हे सातत्याने केजरीवालांवर टीका कत आहेत त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ? हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे असणार आहे.
दिल्लीची लढाई का महत्त्वाची ?
दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे.भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावे लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असे म्हणत आतिशी यांना ते पद दिले.या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असे वाटत असतांनाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले असून दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या तिरंगी लढतीत नेमके काय होणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
“झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…” ईव्हीएमवरील आरोपांना ‘ECI’चे शायरीतून उत्तर !! महाराष्ट्राचा दाखला देत फेटाळले आरोप
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम मधील छेडछाड,मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासात मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले.
झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…
यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शायरीच्या माध्यमातून ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले ते म्हणाले,“आरोप और इल्जामात का दौर चले,कोई गिला नहीं,झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें,कोई शिकवा नहीं,हर परिणाम में प्रमाण देते है,पर वो विना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!”
ईव्हीएम हॅकिंगचा कोणाताही पुरावा नाही…
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले,“ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की,ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत.”
महाराष्ट्र निवडणुकीचा दाखला
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान खोटे मतदार जोडल्याचा आणि मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर मतदानाची टक्केवारी वाढवल्याचे खोटे आरोप करण्यात आल्याचे सांगत निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले,“मतदारांच्या आकडेवारीत फेरफार करणे अशक्य आहे कारण मतदानाच्या अंतिम टक्केवारीची मतदानाच्या दिवशीच्या सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे.मतदानाची वेळ संपण्याच्या काही वेळ आधी मतदान अधिकाऱ्यांना अनेक कामे पार पडावी लागतात.त्याचबरोबर फॉर्म १७ सी मतदान केंद्रांवर मतदान संपल्यावर मतदान प्रतिनिधींना दिले जाते त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत फेरफार केल्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही.”
५ फेब्रुवारीला दिल्लीत मतदान
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी ७० जागांवर एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून याची मतमोजणी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.