बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली व या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला आहे.दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीकडू या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.