मनसेमुळे आमचे १० उमेदवार पडले…

शिवसेना आणि मनसेबाबत बोलताना मंत्री योगेश कमद म्हणाले,“धनुष्यबाणावर निवडून आलेले ५७ आणि आम्हाला पाठिंबा असलेले ३ अपक्ष असे शिवसेनेचे ६० आमदार आज महाराष्ट्रात आहेत.विधानसभा निवडणुकीत आमचे जवळपास १० आमदार मनसेमुळे पडले आहेत.आपण जर गणित बघितले,आकडेवारी बघितली तर आमचे असे १० उमेदवार आहेत जे मनसेने जेवढी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहे म्हणून मला वाटते याची पुनरावृत्ती होऊ नये.महायुती आणखी भक्कम करायची असेल,हिंदुत्त्व आणखी भक्कम करायचे असेल,मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि मुंबईमध्ये पुन्हा महायुती निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.”