यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
येथील नितीन सोनार मित्र परिवाराच्या वतीने ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने पाटील फर्म हाऊसच्या नियोजीत लॉन्सच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे जेष्ठ पत्रकार डी.बी पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पि.एस.सोनवणे,भगतसिंग पाटील,नितीन सोनार,अनिल पाटील इंजिनीअर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करीत आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी यावलचे पत्रकार अय्युब पटेल यांच्या पत्नी नसीमबी पटेल व साकळी येथील पत्रकार किरण माळी यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
दरम्यान कार्यक्रमास उपस्थित पि.एस.सोनवणे,भगतसिंग पाटील,पत्रकार डी.बी.पाटील,सुधीर चौधरी व शेखर पटेल यांच्यासह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नितीन सोनार मित्र परिवाराच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन नितिन सोनार मित्रपरिवाराच्या वतीने नितीन सोनार,अनिल पाटील इंजिनीअर,प्रशांत कासार,अशोक पाटील,मनोज सुतार,अतुल बडगुजर,राज काठोके,पिंटू मंदवाडे,किशोर कपले,राम सोनवणे,चेतन अढळकर, दिलीप जाधव,संजू सोनार,पि.एस.सोनवणे आदी उपस्थित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार चेतन अढळकर यांनी व्यक्त यांनी केले.प्रसंगी जेष्ठ पत्रकार डी.बी.पाटील,अय्युब पटेल,शेखर पटेल,सुनिल गावडे,सुधीर चौधरी,बाळासाहेब आढाळे,तेजस यावलकर,प्रकाश चौधरी,जिवन चौधरी,ए.टी.चौधरी,शब्बीर खान,रणजीत भालेराव,भरत कोळी,ज्ञानदेव मराठे आदी पत्रकारांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.