ई रेशन कार्डचे वर्गीकरण कसे होणार ? 

उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशनकार्डचे वर्गीकरण केलेले असून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशनकार्ड दिले जाते.सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते परंतु या रेशनकार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई-रेशन कार्डमध्ये याचे वर्गीकरण कसे होणार ? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला.त्यावेळी पडोळे म्हणाले,ई-रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे.दरम्यान तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई- शिधापत्रिकाच मिळणार आहे तसेच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई-रेशन कार्ड हवे असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे.सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्याचे वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई-रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे असेही आनंद पडोळे यांनी स्पष्ट केले आहे.