मेरठ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० जानेवारी २५ शुक्रवार

मेरठच्या लिसारी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले.पीडितांमध्ये एक पुरुष,त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे.ही तीनही मुले १० वर्षांखालील आहेत.या जोडप्याचे मृतदेह जमिनीवर सापडले तर मुलांचे मृतदेह बेडच्या आतमध्ये आढळून आले.इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार,सर्व मृतदेहांच्या डोक्याला जखमा होत्या आणि जड वस्तूने मारल्याच्या खुणा आहेत.मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. प्राथमिक निरीक्षणानुसार,वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे दिसते.घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून तपास वेगाने सुरू आहे असे एसएसपी विपिन टाडा यांनी सांगितले.

बाहेर कुलूप तर आतमध्ये मृतदेह

शेजाऱ्यांना काहीतरी असामान्य दिसल्यावर पोलिसांना सतर्क करण्यात आले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली.शेजाऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांना घराला बाहेरून कुलूप लागलेले दिसले त्यामुळे पोलिसांनी छतावरून आत प्रवेश केला परंतु आतमध्ये शिरताच पोलिसांना भीषण चित्र दिसले.पाच जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.जड वस्तूमुळे हे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

घर अस्ताव्यस्त तर सर्वत्र मृतदेह

घटनास्थळावरील व्हिज्युअल्समध्ये घर पूर्णपणे अस्ताव्यस्त आणि आजूबाजूला पडलेले मृतदेह दिसत आहेत.सर्वात लहान मुलाचा मृतदेह एका गोणीत बेडबॉक्समध्ये आढळून आला.याबाबत शेजाऱ्यांनी सांगितले की बुधवारी संध्याकाळपासून हे कुटुंब दिसले नाही ज्यामुळे चिंता वाढली आणि अखेरीस शोध लागला.या घटनेबाबत अधिक माहिती देताना एसएसपी टाडा म्हणाले की,घराला बाहेरून कुलूप होते.पोलिसांनी छतावरून आत प्रवेश केला असता त्यांना मृतदेह आढळून आला.फॉरेन्सिक टीम घराची तपासणी करत आहेत तसेच हत्या कशी झाली ? कोणी केली ? याची कसून चौकशी सुरू आहे.

एकाच कुटुंबातील ५ जणांची गळा चिरून हत्या !! पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या !!

एक खोली,एक बेड आणि जमिनीवर मृतदेह

मोईन हा भाड्याच्या घरात राहत होता.दरवाजा तोडून भाऊ आत पोहोचला.कपडे आणि सामान जमिनीवर विखुरले होते.दारासमोरच एक खोली होती,जवळच एक छोटेसे स्वयंपाकघर होते.खोलीतील जमिनीवर,बेडजवळ,मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह,चादरीमध्ये होते.धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला होता.जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता.मुलींचे मृतदेह बेडच्या आत लपवून ठेवले होते हे मृतदेह पोत्यात होते.आतमध्ये रक्ताचा सडा होता.

भाऊ घरी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आला

जेव्हा मोईनचा भाऊ सलीम त्याच्या पत्नीसह घटनास्थळी पोहोचला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.सलीम म्हणाला की,मला माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले.डॉक्टरांना पाहून मी मोईनच्या घरी पोहोचलो.दरवाजा बाहेरून बंद होता.मी बाहेरून आरडाओरडा केला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.सामान सर्वत्र विखुरले होते.भाऊ आणि वहिनीचे मृतदेह जमिनीवर पडले होते.जवळ जाऊन पाहिले तर तो मयत झाला होता.

भाची म्हणाली,आम्ही काल रात्री नऊ वाजता बोललो

भाची तरन्नुमने सांगितले की,आम्ही कालपासून काकाचा (मोईन) शोध घेत होतो.तो कुठेतरी गेला असावा असे आम्हाला वाटले.त्यांच्यात भांडणेही होत होती.काल रात्री नऊ वाजता काकांशी फोनवर बोललो.सगळे नॉर्मल होते.मला माहित नाही,मग काय झाले?आमचे घर थोडे अंतरावर आहे,घराला बाहेरून कुलूप होते.हत्येची माहिती मिळताच मोईनचा शेजारी मोहम्मद वसीम तेथे पोहोचला.तो म्हणाला की,२००९ पर्यंत मोईन आपल्या कुटुंबासह झाकीर कॉलनीतील मक्का मदिना मशिदीच्या गल्लीत राहत होता.मोईनचे सर्व भाऊ गवंडी म्हणून काम करतात.मोईन मवाना आणि रुरकी येथेही राहत होता हे कुटुंब दीड महिन्यापूर्वीच येथे आले होते.हे लोक अतिशय साधे होते.कुटुंबात कोणाशीही वाद नव्हता.

आसमा ही मोईनची तिसरी पत्नी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मोईनचे तीन लग्न झाले होते.सुमारे १५ वर्षांपूर्वी त्याने जफ्रा नावाच्या मुलीशी पहिले लग्न केले.इल्मान या मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे निधन झाले.सध्या मुलगी किठोरे येथे मावशीकडे राहते.११ वर्षांपूर्वी मोईनने नाराशी दुसरे लग्न केले मात्र रोजच्या भांडणानंतर तिचा घटस्फोट झाला त्यानंतर त्याने अस्माशी लग्न केले.अस्मा आधीच विवाहित होती.अस्माला तीन मुली होत्या.मोईनच्या लहान मुलींची प्रकृती ढासळत चालली होती असे लोकांचे म्हणणे आहे.एक मौलवी घरी भेट देणार होता.पोलिसांनी मोईनच्या भावाला ताब्यात घेतले आहे.त्याच्यावर खुनाचाही संशय व्यक्त केला जात आहे.एक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात आहे. मोईनने त्याच्याकडून औषधे विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.