दहिगाव येथे अवैद्यधंदे व दारूबंदी ग्रामसभा ठरावाचा बोजवारा !! तिन वेळा ग्रामसभा ठराव होवुन देखील अवैद्यधंदे जैसे थे !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ जानेवारी २५ शनिवार
तिन वेळा ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव घेवुन गावात सर्रासपणे विक्रीला जाणारी देशी व गावठी दारूची दारूबंदी करावी असा ठराव करून देखील गावात दारू विक्री व अवैध धंदे बंद होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाची कारवाही बाबतची कमालीची उदासीनता दिसुन येत असल्याने दोन दिवसापुर्वी दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावाचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच अजय अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली पुनश्च ग्रामसभा घेण्यात आली व या ग्रामसभेत पुनश्च गावात सुरू असलेले दारूबंदीसह अवैधंदे त्वरित बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्याचबरोबर अनेक विषयांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.
गावात प्रामुख्याने दारू पत्ता यासारखे अवैधंदे जोमाने सुरू आहेत तसेच गावात काही महिन्यापूर्वी उपजिल्हा पोलीस अधिकारी आले असता त्यांचे समक्ष शांतता समितीच्या बैठकीत अवैध धंदे बंद करण्याची मागणी झाली असता त्यावर त्यांनी धंदे बंद करण्यात येतील असे आश्वासन दिले होते.मात्र अद्यापही सदरील अवैध धंदे बंद झालेले नाहीत.दरम्यान ग्रामपंचायततर्फे वेळोवेळी पत्रव्यवहार झालेले आहेत तरी याची दखल घेतलेली गेली नाही दारूच्या महापुरामुळे गावात अनेक दारुड्यांना मृत्युमुखी व्हावे लागले आहे.दारूचे धंदे व पत्त्याचे अड्डे त्वरित बंद व्हावेत अशी मागणी जोर धरत आहेत या धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत अशी ग्रामस्थांची यावेळी हाक होती तर गावातील स्वच्छता आणि गाव हागणदारीमुक्त कसे होईल यासंदर्भात बचत गट सदस्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या त्यांनी प्रत्येक महिलेची संपर्क करून गावात स्वच्छता कशी राहील आणि गाव हागणदारीमुक्त कसे होईल याबाबत पटवून देण्याचे सांगण्यात आले तर अपंगांना गावातील वसुली झाल्यावर त्या निधीतून पाच टक्के निधी अनुदान देण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे.गावातील पथदिवे याबाबतही चर्चा करण्यात आली.प्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी इतिवृत्त वाचन केले तर सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांच्या भावना ओळखून त्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी रजनी अनिल बडे, आशाबाई कृष्णा पाटील,दिनेश महाजन तर उर्वरित सदस्य अनुपस्थित होते.ग्रामसभेत प्रत्येक लोकप्रतिनिधीने आवर्जून उपस्थित रहावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे एकूण १३ सदस्य होते तेरा सदस्यांपैकी पाच सदस्य उपस्थित यामुळे गावाच्या समस्या काय आहेत हे प्रत्येक वर्गातील सदस्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे असते मात्र तसे ठराविक ग्रामपंचायत सदस्यांकडून होत नसल्याची चर्चा आहे.